
सावंतवाडी : शहरातील मोती तलावात बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा मगरीचे दर्शन दिले आहे. येथील कवीवर्य केशवसुत कट्ट्यावर बसलेल्या नागरिकांच्या दृष्टीस ही मगर पडली. तलावातील कॉंक्रीटच्या चौथर्यावर ती बसलेल्या स्थितीत होती. इव्हिनिंग वॉकला आलेल्या अनेकांशी या मगरीचे छायाचित्र आपल्या मोबाईलमध्ये कैद केले. काही वर्षांपूर्वी मगीरच वास्तव्य येथे होत. मधल्या काळात ही मगर दिसत नव्हती. परंतु, काही महिन्यांपूर्वी मगरीन पुन्हा दर्शन दिल. त्यानंतर आज पुन्हा तलाव काठाच्या परिसरात मगर दिसून आली.