
सावंतवाडी : इन्सुली श्री देवी माऊली मंदिरची फंडपेटी चोरट्यानी फोडली. इन्सुली श्री देवी माऊली मंदिराची नव्याने यात्रोत्सवाला बविण्यात आलेली फंडपेटी चोरट्यांनी बुधवार ( दि. २२ ) रात्री 4. ०० वा फोडली. मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले असल्याने चोरी करण्याचे सर्व फूटेज मिळाले आहे. मात्र श्री देवी माऊलीच्या कृपा आशिर्वादाने फंड पेटीच्या रक्कमेपर्यत जाता आले नाही. जवळ जवळ दहा मिनिटे पेटी फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला परंतु कुणाची तरी चाहूल लागताच त्यांनी पळ काढला.
सकाळी पूजा करण्यासाठी मानकरी आले असता मंदिराचा दरवाजा व फंडपेटीचा दरवाजा उघडलेला दिसला. याबाबत देवस्थान कमिटी अध्यक्ष कृष्णा सावंत यांनी देवस्थान कमिटी सदस्य मानकरी व पोलिस पाटील सौ. जागृती गावडे यांना कल्पना देवून बांदा पोलिस स्टेशनला कळवले. मात्र रोख रक्कम रुपये 1,760 श्री देवीच्या कृपेने चोरट्यांच्या हाती लागले नाहीत.