
देवगड : बापर्डे बौध्दवाडी येथील भारत सकपाळ याने जेवण देत नसल्याचा कारणावरून वृध्द आई व भावाचा बांबुच्या दांड्याने ठेचुन खुन करून त्यांचा चेह-यावर राख टाकण्याची कौर्यसीमा गाठणा-या संशयित आरोपी भारत मुरारी सकपाळ (४९) याला पोलिसांनी अटक करून देवगड न्यायालयासमोर बुधवारी सकाळी हजर केल्यानंतर न्यायालयाने १७ मार्चपर्यंत दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
बापर्डे बौध्दवाडी येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास भारत मुरारी सकपाळ यांनी घरगुती व जेवण देत नसल्याचा कारणावरून त्याची आई शोभा मुरारी सकपाळ(७०) व भाऊ महेंद्र मुरारी सकपाळ(५६) यांचा बांबुच्या दांड्याने ठेचून खुन केला.त्यांनी दोघांच्या तोंडावर, डोक्यावर दांड्याने प्रहार केला.या हल्ल्यात दोघही जागीच गतप्राण झाली.त्यानंतर त्यांनी दोघांच्या तोंडावर चुलीतील राख टाकली.
या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जावून संशयिताला ताब्यात घेतले व खुनासाठी वापरलेला बांबूचा दांडा व संशयिताचे रक्ताळलेले कपडे ताब्यात घेतले होत.याबाबत फिर्याद पोलिस पाटील नितीन नाईकधुरे यांनी दिली असून पोलिसांनी आई व भाऊ याचा खुन केल्याप्रकरणी भारत मुरारी सकपाळ याच्याविरूध्द भादवि ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल कस्न पोलिसांनी अटक केली व बुधवारी न्यायालयासमोर हजर केले.न्यायालयाने १७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.