मोरगांव फार्महाऊसमधील साहित्य चोरीप्रकरणी 5 जणांवर गुन्हा !

Edited by: संदीप देसाई
Published on: January 02, 2024 18:45 PM
views 136  views

दोडामार्ग : एकमेकांच्या संगनमताने व लबाडीच्या इराद्याने ग्राबीन पानशील फर्नांडिस रा. महाबळेश्वर यांचे मोरगाव, तालुका दोडामार्ग येथे बंद अवस्थेत असलेल्या फार्महाउस मधील कोल्डरूमच्या आत मध्ये प्रवेश करून त्यामध्ये असलेले एसी चा कॉम्प्रेसर व रेडिएटर चोरी करण्याच्या उद्देशाने बाहेर फेकून देऊन व कोल्डरूममध्ये असलेले लोखंडी सामान तसेच इलेक्ट्रिक फॅन हे चोरी करण्याचा प्रयत्न करीत असताना मिळून आले म्हणून  दोडामार्ग पोलिसांनी  ५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. 

   मधुकर अर्जुन पवार, वय-65, रा. मोरगाव पवारवाडी, तालुका  दोडामार्ग यांनी फिर्याद नोंदवल्या नुसार हुसेन दुर्गाप्पा लाडलक्ष्मी वय- 31,राहणार -अडकूर, तालुका- चंदगड, जिल्हा कोल्हापूर,  सुरेश बाबू तुम्मानवर, वय 37 राहणार दड्डी, तालुका हुकेरी, जिल्हा बेळगाव,  राज्य कर्नाटक, रामू दुर्गाप्पा लाडलक्ष्मीकार, वय-42, राहणार शिरगाव तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर, सुरेश सत्त्पा सिंगनुर, वय 28, न्यू कांडरवल्ली तालुका जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक, श्याम बाबू तुम्मानवर, वय 19 राहणार-दड्डी, तालुका हुकेरी,  जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास  सपोनि जयेश ठाकूर करीत आहेत.