'या' पुलाच्या कामाचे श्रेय रुपेश राऊळ यांना : खा. विनायक राऊत

नेमळे - तळवडेला जोडणाऱ्या पुलाचं भूमिपूजन
Edited by:
Published on: December 08, 2023 18:46 PM
views 378  views

सावंतवाडी : शिवसेना पक्षप्रमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सावंतवाडी तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी नेमळे व तळवडे या दोन गावांना जोडणाऱ्या पुलासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली होती. त्यानुसार तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी १ कोटी ७० लाख रुपये निधी मंजूर केला होता. त्यामुळे या पुलाच्या कामाचे खरे श्रेय रुपेश राऊळ यांना द्यावे लागेल असे उद्गार रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सचिव विनायक राऊत यांनी काढले. खासदार विनायक राऊत व अरुण दूधवडकर यांच्या हस्ते या पुलाचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

तर लवकरच तळवडे गावचे सुपुत्र आणि आमचे मित्र स्वर्गीय प्रकाश परब स्मृती प्रित्यर्थ रुग्णवाहिका सुरू करण्यात येणार असल्याचे खासदार राऊत यांनी यावेळी सांगितले. तर गावच्या विकासासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना कटिबद्ध असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळामध्ये अर्थसंकल्पातून या कामासाठी निधी मंजूर करण्यात आला.

पावसाळ्यामध्ये या दोन्ही गावांचा संपर्क तुटत असे त्यामुळे येत्या पावसाळ्यापूर्वी पुढील तीन महिन्यात हे काम पूर्ण करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब, जिल्हा समन्वयक बाळा गावडे, महिला संघटक जानवी सावंत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सावंतवाडी तालुका प्रमुख रुपेश राऊळ, जिल्हा संघटक शब्बीर मणियार, युवा सेना तालुका संघटक गुणाजी गावडे आबा केरकर आबा सावंत रमेश गावकर आत्माराम राऊळ, शिवराम राऊळ उपतालुका संघटक रूपाली चव्हाण आप्पा परब नेमळे सरपंच सौ दीपिका भैरे,उपसरपंच सखाराम राऊळ, बाळू माळकर,अशोक राऊळ, महिला तालुका संघटक भारती कासार,उपसरपंच सखाराम राऊळ,शाखा प्रमुख सचिन मुळीक,तळवडे सरपंच वनिता मेस्त्री, माजी सरपंच, यशोदा परब हिमांशू परब आदी ग्रामस्थ उपस्थित होते.