भाजप स्थापना दिनानिमित्त कडवई सुतारवाडीत गोशाळेचं उद्घाटन

Edited by:
Published on: April 07, 2025 19:17 PM
views 120  views

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील कडवई सुतारवाडी येथे भाजप स्थापना दिनाचे औचित्य साधून गोशाळेचे उद्घाटन करण्यात आले. हे उद्घाटन भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या शुभहस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या वतीने सर्वांना भाजप स्थापना दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

या प्रसंगी राजेश सावंत म्हणाले की...आजच्या तरुण पिढीने गोवंश संरक्षणासाठी पुढे आले पाहिजे. अविनाश गुरव व त्यांच्या सहकाऱ्यांनी गोशाळा उभारून गोवंश संरक्षणाच्या दृष्टीने टाकलेले पाऊल कौतुकास्पद आहे असे ते पुढे म्हणाले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ऑनलाईन मार्गदर्शन लाभले. 

 कार्यक्रमाला संगमेश्वर चिपळूण विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद अधटराव,संगमेश्वर उत्तर तालुकाध्यक्ष विनोद म्हस्के,उत्तर संगमेश्वर तालुका सरचिटणीस मिथुन निकम,युवा मोर्चा संगमेश्वर चिपळूण विधानसभा क्षेत्रप्रमुख अविनाश गुरव,ज्येष्ठ नेते राजन कापडी,तालुका सरचिटणीस डॉ.अमित ताठरे, युवा मोर्चा उत्तर संगमेश्वर तालुका सरचिटणीस प्रथमेश कडवईकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनंत नांदलस्कर, उत्तेश धामणाक,चैतन्य रेडीज, विशाल शिलकर, निलेश जोयशी, ओमकार काटकर, अनिकेत मोहिते,निलेश बल्लाळ, राकेश नांदलस्कर,विशाल कडवईकर, अभी पवार, दिप्तेश जोशी,बावा कांबळे,शैलेश नाखरेकर, योगेश कदम यांनी मेहनत घेतली.