गव्यांनी चढली हॉस्पिटलची पायरी...!

Edited by: विनायक गांवस
Published on: May 20, 2024 09:50 AM
views 769  views

सावंतवाडी : शहरात सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास माठेवाडा सावंतवाडी येथील डॉ जयेंद्र परुळेकर यांच्या परूळेकर नर्सिंग होम समोरील रस्त्यावरून दोन मोठे गवे हाॅस्पिटलच्या पायऱ्या चढून हाॅस्पिटल समोर आले. हाॅस्पिटलच्या डावीकडील भागात ते धावत पुढे गेले. पुढील वाट बंद असल्याने शेजारच्या शिर्के यांच्या अंगणात त्यांनी उडी घेतली. पत्र्याच्या शेडवर उडी घेतल्याने शेड मोडून नुकसान झाले. नेहमी हाॅस्पिटलच्या समोर अनेक पेशंट आणि त्यांचे नातेवाईक रुग्ण तपासणीच्या प्रतिक्षेत उभे असतात. आज सगळेजणं वेटींग रुममध्ये बसलेले होते म्हणून मनुष्यहानी झाली नाही आणि मोठा अनर्थ टळला अशी प्रतिक्रिया डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी दिली. तर डॉ जयेंद्र परुळेकर यांनी जिल्हा वनसंरक्षक यांच्या कानावर घडलेला प्रकार घातला असून पंचनाम्याची प्रकिया होत आहे.