
सावंतवाडी : महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कुडाळ यांच्या क्रॉपसॅप योजनेंतर्गत रब्बी हंगाम चवळी पीक शेतीशाळेचे कुडाळ तालुक्यातील निळेली-देऊळवाडी येथे गुरुवारी करण्यात आले होते.
यावेळी श्री गणेश शेतकरी बचतगटाचे शेतकरी उपस्थित होते. यावेळी कृषी सहाय्यक प्रशांत कुडतरकर यांनी चवळी पीक लागवडीविषयी माहिती दिली. कृषीविषयक योजनांची माहिती कृषी पर्यवेक्षक गीता परब यांनी दिली. चवळी पीक बीजप्रक्रिया बाबत गावचे कृषी सहाय्यक धनंजय कदम यांनी माहिती दिली.
शेतकऱ्यांना चवळी पीक लागवडीबाबत बीज प्रक्रिया व ओळीत पीक पेरणीबाबत प्रात्यक्षिक करण्यात आले. यावेळी शेतकरी लक्ष्मण कोठावळे, श्रीकृष्ण भितये, चंद्रकांत धुमक, दिलीप सावंत, कृषी सखी स्वप्नाली सावंत व कृषिमित्र ओमकार पालव तसेच गावातील शेतकरी उपस्थित होते.