LIVE UPDATES

सिंधुदुर्गातील गोरक्षकांना पुन्हा यश

Edited by: विनायक गांवस
Published on: June 07, 2025 11:34 AM
views 133  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोरक्षकांना पुन्हा एकदा यश मिळाले आहे. जिल्ह्यातील देशी गोवंशाची अवैधपणे बेकायदेशीर वाहतूक रोखण्यात अग्रेसर असलेले बजरंग दल सावंतवाडी यांनी दाणोली चेकपोस्ट वर ०३ जाने. २०२५ रोजी पकडलेल्या MH 07AJ3575 या कुडाळ येथील बोलेरो पीकअप गाडीमध्ये जप्त केलेल्या गोवंशाच्या खावटीचा दर दिवशी  200 रुपये असा एकूण 60 हजार रुपये  एवढा खावटीचा खर्च भरण्याचे न्यायालयाने आदेश दिले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देशी गोवंश वाहतूक करणारी बोलेरो पिकअप गाडी सावंतवाडी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दाणोली येथे पकडण्यात आली होती. या गाडीतून जप्त करण्यात आलेले देशी गोवंश गोवा राज्यातील गोमंत गोसेवा महासंघ यांच्या गोशाळेत ठेवण्यात आले आहेत. या प्रकरणी जप्त करण्यात आलेली बोलेरो गाडी MH07AJ 3575 मालक हुरबानो इब्राहीम खतीब याच्या गाडीमधून जप्त करण्यात आलेले बैल आपल्याला परत मिळावे असा अर्ज इब्राहिम रियाज शेखच्या वतीने सावंतवाडी न्यायालयात करण्यात आला होता. यावर सावंतवाडी न्यायालयात  गोरक्षण संस्था ध्यान फाउंडेशन च्या वतीने वकील राजू गुप्ता, वकील पलाश चव्हाण (मालवण)  वकील राहुल मडगावकर, मानद पशु कल्याण अधिकारी सचिन झुंझारराव यांनी सावंतवाडी न्यायालयात आपले युक्तिवाद मांडले. आरोपी यांचे वकील  आणि गोरक्षण कार्यकर्ते यांचे वकील या दोघांचेही युक्तिवाद झाल्यानंतर  सावंतवाडी न्यायालयाने अर्जदार इब्राहिम रियाज शेख तब्बल 60 हजार रुपये एवढा खावटी खर्च जमा करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बजरंग दल कार्यकर्ते गोरक्षक यांनी समाधान व्यक्त केले आहे.

ही कारवाई बजरंग दलाचे गोरक्षा विभाग प्रमुख दिनेश गावडे बजरंग दल संयोजक श्रीकृष्ण धुळपनावर, साईराज नार्वेकर, लादू रायका, रोहन धुरी, हितेन नाईक, प्रथमेश गावडे, अथर्व केसरकर, कौशिक केसरकर यांनी जानेवारी महिन्याच्या तीन तारीख रोजी केली होती. न्यायालय सावंतवाडी यांनी सुद्धा या पूर्वी अशाच प्रकरणा मध्ये खावटी खर्च भरण्याचे आदेश दिले होते.