सिंधुदुर्गात 1 एप्रिल पासून गायीच्या दुधाचे दर पूर्ववत होणार !

गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे सतीश सावंत,आ. वैभव नाईक यांना आश्वासन
Edited by: उमेश बुचडे
Published on: March 22, 2024 09:11 AM
views 217  views

सिंधुदुर्ग : गोकुळ दुध संघाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात गाईच्या दुधाचे कमी केलेले दर पूर्ववत करण्यासाठी  जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली आमदार वैभव नाईक व  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दूध संस्थांचे चेअरमन यांनी आज कोल्हापूर येथे गोकुळ दुध उत्पादक संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांची भेट घेतली.

गायीच्या दुधाचे दर प्रतिलिटर ४ रु कमी करण्यात आल्याने गायीच्या दुधाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे गायी पालन करणारे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून दुधाचे दर पूर्ववत करण्याची मागणी यावेळी चेअरमन अरुण डोंगळे यांच्याकडे करण्यात आली. त्यावर त्यांनी १ एप्रिल पासून गायीच्या दुधाचे दर पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती सतीश सावंत यांनी दिली. 

यावेळी आमदार वैभव नाईक, मिथिल सावंत, रमेश सावंत, घोणसरीचे गणेश परब, फोंडाघाटचे विठोबा येंडे, डामरेचे संतोष साटम, पंकज  साटम , प्रसाद सावंत, पोखरणचे पिंटू भोसरे, आंब्रडचे टिपू सावंत, अमय ठाकूर आदी उपस्थित होते.