
कुडाळ : घराच्या समोरील वाढवलेल्या गवतात खंठीला बांधुन ठेवलेल्या गायीने जंगली जनावरे मारण्यासाठी गवतात ठेवलेला कोणता तरी स्फोटक पदार्थ तोंडात घेऊन चावल्याने त्याचा स्फोट होऊन गायीचा जबडा फुटुन त्यात ती जखमी झाल्या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद कानोजी पांडुरंग म्हाडदळकर (वय ५६)रा. बांबोळी नेहरूनगर धनगरवाडी यांनी दिली आहे.
कानोजी पांडुरंग म्हाडदळकर यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, आम्ही शेती व्यवसाय करत असुन आमच्याकडे पाळीव जनावरे आहेत त्यात तीन गायी व एक पाडा (वासरु) आहेत. माझी सर्व जनावरे ही सकाळी व सध्याकाळी अशी आमच्या घराच्या कंपाऊडच्या बाहेर जवळपास वाढलेल्या गवतात खुंठी लावुन लांब असणा-या दोरीने चरण्यासाठी बांधलेली असतात. हा आमचा नेहमीचा दिनक्रम आहे. 28 जानेवारी रोजी सायंकाळी मी आमची जनावरे त्यात तीन गायी व एक पाडा (वासरु) या घराच्या पाठीमागील जवळपास असलेल्या गवतात खुंठी लावुन लांब असणा-या दोरीने बांधुन ठेवली असता सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास मोठा आवाज आला. त्यामुळे मी व माझी पत्नी घरा बाहेर आलो. व ज्या ठिकाणी गाय व वासरू बांधून ठेवले होते त्या ठिकाणी धाव घेतली असता त्या बांधून ठेवलेली गाय रक्तबंबाळ अवस्थेत दिसली, यावेळी मी असलेल्या गायीच्या तोंडातुन रक्त येत होते आम्ही ताबडतोब गुरांच्या डॉक्टरना फोन केला व पोलीस ठाण्यात फोन करुन सर्व घटना सांगितली. गाईला झालेली गंभीर दुखापत ही गायीने स्फोटक पदार्थ तोंडात घेवुन चावल्याने स्फोट होवुन झाली आहे असे गुरांच्या डॉक्टरांनी सागितले. यानंतर कुडाळ पोलीस ठाणे तेजात आपण सविस्तर अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याबाबत कुडाळ पोलीस ठाण्याच्या अंमलदारांकडून माहिती देण्यात आली.