
सावंतवाडी : आंबोली वनक्षेत्रातील नांगरतास येथील वन जमिनीत हत्ती गवत रोपवन कामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप निगुडे येथील माहिती अधिकार कार्यकर्ते महेश सावंत यांनी केला. या कामातील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी त्यांनी केली असून, या मागणीसाठी त्यांनी १३ फेब्रुवारी २०२४ पासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिलाय.
दरम्यान, महेश सावंत यांनी संबधीत कार्यालयाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आंबोली वनक्षेत्रातील नांगरतास येथील वन सर्व्हे नंबर २६४, २८५ मध्ये लाखो रुपयांचा भ्रष्ट्राचार झाला आहे. त्याची चौकशी व्हावी. माहिती अधिकारात माहिती देण्यास टाळाटाळ. खोटे दस्तऐवज तयार करून शासनाचा लाखो रुपयांचा अपहार. बनावट रोपे खरेदी दाखवून दिशाभूल या सारखे गंभीर आरोप महेश सावंत यांनी केले आहेत.