कुडाळ पाठोपाठ देवगडचे नगरसेवकही फोडले

ठाकरे गटाला भाजपचा धक्का
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: February 12, 2025 21:44 PM
views 350  views

सिंधुदुर्गनगरी : मंत्री नितेश राणे यांनी आज उबठा पक्षाला देवगड  नगरपंचायत मध्ये जोरदार झटका दिला. वॉर्ड क्रमांक ११ चे नगरसेवक बुवा तारी, व वार्ड क्रमांक आठ चे नगरसेवक संतोष तारी यांनी भारतीय जनता पक्षात आपल्या संख्य कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ओरोस येथील मेळाव्यात पक्ष प्रवेश केला.

भाजप नेते खासदार नारायण राणे, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष  आमदार रवी चव्हाण, पालकमंत्री नामदार नितेश राणे,जिल्हाध्यक प्रभाकर सावंत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी मध्ये हा प्रक्षेपक्ष प्रवेश केला.त्यामुळे देवगड नगरपंचायत मध्ये भारतीय जनता पार्टीचे या पक्षप्रवेशाने फार मोठी ताकद वाढली आहे. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला फार मोठे खिंडार पडले आहे.

  यावेळी नगरसेवक बुवा तरी, संतोष तारे यांचे समवेत वीरेंद्र कुमठेकर, सुबोध कांबळे, बाबू वाडेकर, राजा निकम, अजिंक पेडणेकर, रोहन गाडी, अक्षय वेंगुर्लेकर, स्वागत बांदेकर, बाबू बांदेकर, मनोज बांदेकर, पिंटू जाधव, दिनेश पाटील, निलेश सावंत, अशा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी पक्ष प्रवेश केला.