
कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीनंतर आज विषय समिती सभापती निवडीची सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र यावेळी सत्ताधारी गटनेते रुपेश नार्वेकर यांनी समित्या नेमण्यात येऊ नयेत असे निवेदन दिले. त्यावर विरोधी गटनेते यांनी यावर आक्षेप घेत समित्या नेमण्यात याव्यात असे सांगितली.
यावर पिठासीन अधिकारी गौरी पाटील यांनी यावर मतदान घेतले. त्यावेळी समान मते मिळाल्याने चिठी द्वारे निर्णय घेण्यात आला यात समित्या न नेमण्यात याव्यात असा निर्णय घेण्यात आला. बांधकाम, आरोग्य, पाणीपुरवठा, महिला बालकल्याण विषय समिती होणार नाही. त्यामुळे नगरसेवकांना आता सभापतीपदाची संधी हुकली आहे.










