
कणकवली : कणकवली तेली आळी येथे कस्टम ऑफिस समोर तुंबलेल्या गटाराची नगरसेविका मनस्वी ठाणेकर यांनी घेतली. बरेच तेली आळी कस्टम ऑफिस समोरील गटारात सांडपाणी साचून नागरिकांच्या जीवास धोका उद्भवत असून संसर्गजन्य रोग होण्याची भीती कणकवलीतील नागरिक व्यक्त करत असल्याची बातमी कोकणसाद LIVEने प्रसारित केली होती.
त्यानंतर लगेचच या बातमीची दखल प्रभाग क्रमांक बाराच्या नगरसेविका मनस्वी ठाणेकर यांनी या ठिकाणी येऊन गटाराची पाहणी केली. नगरपंचायत कर्मचाऱ्याला गटार साफ करण्यास सांगितले. साचलेली माती देखील नगरपंचायत अग्निशामक बंबाच्या माध्यमातून प्रेशरच्या पाण्यातून काढण्यात आले. त्यामुळे नगरसेविका मनस्वी ठाणेकर यांची कार्य तत्परता देखील यावेळी दिसून आल्याने परिसरातील नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले












