नगरसेवक रोहन खेडेकर अपात्र | जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम

Edited by: नागेश दुखंडे
Published on: July 19, 2023 14:54 PM
views 234  views

देवगड : देवगड जमसंडे नगरपंचायतीचे नगरसेवक रोहन खेडेकर हे विनापरवाना बांधकाम केल्याप्रकरणी दोषी ठरले असून, त्यांच्यावर जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी अपात्रतेची कारवाई केली आहे.

ही कारवाई अंतिम असून त्यांना नगरसेवक पदावर अपात्र ठरवले आहे रोहन खेडेकर यांनी आपल्या जागेमध्ये विनापरवाना अवैधरित्या बांधकाम केले होते याबाबत माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमध्ये रोहन खेडेकर यांनी केलेले अवैध बांधकाम जिल्हाधिकाऱ्यांच्या नजरेला आणून त्यांना नगरसेवक पदावरून त्यांना दूर करावे अशी मागणी केली होती.

जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत यापूर्वीच त्यांना अपात्र ठरवले होते. मात्र, यातील काही तांत्रिक विषयांसाठी रोहन खेडेकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाचे निकालानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी यातील तांत्रिक बाबी पूर्ण करून आपला पूर्वीचाच निकाल कायम ठेवला आहे. फिर्यादीच्या वतीने अँड. राजेंद्र रावराणे व अँड. प्राजक्ता शिंदे यांनी बाजू मांडली आहे.