
सावंतवाडी : नगरसेवक देव्या सूर्याजी यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रभागातील गंभीर समस्यांबाबत न.प. अधिकारी वर्गाला सोबत घेऊन पाहणी करण्यात आली. यावेळी येथील नागरिकांनी मांडलेल्या व्यथा तसेच इतर समस्या तातडीने सोडण्यासाठी कार्यवाही करावी अशी सूचना श्री. सुर्याजी यांनी केली.
यावेळी नगरपरिषद बांधकाम विभागाचे अधिकारी तुषार सरडे, विठ्ठल कशाळीकर आरोग्य विभाग विनोद सावंत,दीपक म्हापसेकर यांच्या उपस्थितीत प्रभागातील सर्व नाल्यांवरील वाढलेली झाडी तोडून नाले साफ करण्याच ठरविण्यात आले. तसेच या कामाला तात्काळ सुरूवात देखील करण्यात आली. भरवस्तीमधील पोकळे घर व दैवज्ञ गणपती मंदिर मागील बाजूस रस्त्यावर साचणारे ड्रेनेज व पावसाचे पाणी योग्य प्रकारे गटार मधून नाल्या पर्यंत जाण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्या. तसेच सार्वजनिक शौचालय व गवंडळकर घरापासून अशोक मेस्त्री यांच्या घरापर्यंत नवीन गटार बांधून बालाजी मठामागील नाल्यापर्यंत चेंबर टाकून बंदिस्त करण्याचा सुचना दिल्या. त्याचप्रमाणे सार्वजनिक शौचालय,चॅपेल गल्ली ते दर्पण रेसिडेन्सी मागील बाजूपर्यंत नाला बांधून बंदीस्त करण्यास बांधकाम विभागाला सांगितले. सिस्टर कॉन्व्हेन्ट कामत नगर बाजूने दर्पण रेसिडेन्सीच्या मागील बाजूस जोडणा-या मार्गावरील साफसफाई करून अर्धवट स्थितीत असलेला स्लॅब पूर्ण करुन यावर तातडीने कार्यवाही करण्याचा सक्त सूचना नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी न.प. अधिकारी यांना जाग्यावर बोलवून परिस्थितीची पाहणी करून केल्या आहेत. यावेळी शेखर पोकळे, जयेश पोकळे, अमित पोकळे, सुशांत पोकळे, सामाजिक कार्यकर्ते शैलेश गवंडळकर, ॲड. प्रथमेश प्रभू,सौ.मेस्त्री व रहिवाशी उपस्थित होते.










