प्रकाश मोर्ये यांच्यावर सहकार महर्षी शिवराम भाऊ जाधव सरकार वैभव पॅनेलची टीका

Edited by: भरत केसरकर
Published on: October 25, 2023 17:54 PM
views 271  views

कुडाळ : सर्वोदय पतसंस्थेचे चेअरमन प्रकाश मोर्ये हे या संस्थेच्या चेअरमन पदावर असून देखील त्या पदाला न्याय न देता यापदाचा गैरवापर करून बेकायदेशीरित्या कर्ज स्वतःला घेवून इतर संचालकांना पण बेकायदेशीररित्या कर्ज वाटप केले आहे.सिंधुदुर्ग जिल्हा उपनिबंधकांकडे याची रितसर तक्रार करून देखिल कोणतीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे आम्ही जनतेच्या दरबारात जाऊन ह्या पतसंस्थेची ही निवडणूक लढवत आहेत.त्यामुळे सहकार महर्षी शिवराम भाऊ जाधव सरकार वैभव पॅनलचे सर्वचे सर्व उमेदवार या निवडणुकीत विजयी होतील. असे सांगत विद्यमान अध्यक्ष प्रकाश मोर्ये यांच्यावर जोरदार टिका सहकार महर्षी शिवराम भाऊ जाधव सरकार वैभव पॅनलचे प्रमुख सगुण धुरी,दादा बेळणेकर आणी दिलीप माळकर यांनी केली आहे.कुडाळ एमआयडीसी रेस्ट हाऊसवर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

   यावेळी बोलताना सगुण धुरी म्हणाले सर्वोदय सहकारी पतसंस्थेची निवडणूक ही गेली अनेक वर्षे झाली नाही.या पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन प्रकाश मोर्ये यांनी कोणतेही कागदपत्र नसताना दहा लाखाचे कर्ज उचलले आहे. तब्बल 38 वर्षानंतर या पतसंस्थेची निवडणूक होत आहे.तसेच मोर्ये यांनी अनेक वेळा नियम धाब्यावर बसवून कर्ज प्रकरणे करून वेळोवेळी उचल केली.ही सर्व प्रकरणे नियमाला धरून नाही आहेत.या संपूर्ण प्रकरणामुळे कै.शिवरामभाऊ जाधव  यांनी रुजवलेले माणगाव  खोऱ्यातून सर्वोदय पतसंस्थेच्या माध्यमातून उभे केलेले सहकार धोक्यात आला आहे.कै.शिवराम भाऊ जाधव यांनी सहकाराच जे रोपटे माणगाव खोऱ्यात लावले ते रोपटे हे काही लोक लुटत आहेत. जणू हा सहकारच धोक्यात आल्याचे चित्र माणगाव खोऱ्यातून पाहायला मिळत आहे. सर्वोदय पतसंस्थेकडून विद्यमान अध्यक्ष प्रकाश मोर्ये यांनी स्वताच्या नावावर दहा लाख कर्ज घेतले.यानंतर पुन्हा कर्ज अचलले.जो बोजा उतरण्यात आला आहे,त्याची ताळमेळ जुळत नाही आहे.मात्र या कर्ज प्रकरणाला जामिन नसून कर्जदाराची पण सही त्या कर्ज फार्मवर नाही आहे.या अनियमित कर्ज उचलण्या मध्ये विद्यमान अध्यक्ष प्रकाश मोर्ये, विद्यमान संचालक जोसेफ डाॅन्टस आणी विद्यमान संचालक उत्तम जनार्दन सराफदार अशा तिघांचा समावेश आहे.ह्या तिघानी कर्जाची उचल केलेली  आहे.तर सदर तीन व्यक्तीवर ४२० प्रमाणे गुन्हे दाखल करण्याची मागणी या आधी तक्रारदार दिलीप माळकर यांनी अप्पर आयुक्त तथा विशेष निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे, विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कोकण भवन नवी मुंबई, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ओरोस,सहाय्यक सहकारी संस्था कुडाळ यांच्याकडे केली आहे.तसेच या संस्थेच्या अध्यक्षासह काही संचालकांना निवडणूक लढवण्यासाठी एक टर्म ची बंदी घालावी व फौजदारी गुन्हा दाखल करावा.अशी मागणी तक्रारदारार दिलीप माळकर यांनी करून देखिल कोणतीच दखल सहकार विभागाने घेतली नाही.त्यामुळेच आमचा विश्वास या सहकार यंत्रणेवरचा उडाला आहे.

    तर या पॅनल मधील उमेदवार दिलीप रघुनाथ माळकर हे बोलताना म्हणाले. १९९९ पासून प्रकाश मोर्ये यांनी बेकायदेशीररित्या कर्जप्रकरणे  करत वेळोवेळी उचल केली आहे. या संदर्भात आपण वेळोवेळी सहकार खात्याकडे तक्रार करून देखील कोणीच त्याची दखल घेतली नाही. सहकार तत्वाच्या नियमांना बगल देत प्रकाश मोर्ये हे कारभार करत आहेत. या त्यांच्या कारभाराला सर्वोदय पतसंस्थेचे शाखा व्यवस्थापक हे सुद्धा साथ देत आहेत. त्यामुळे त्यांच्या पण कारभाराची चौकशी झाली पाहिजे.खरंतर अजून अशी अनेक प्रकरणे आहेत, जी प्रकरणेआपण बाहेर काढली तर प्रकाश मोर्ये यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात तोंड उघडायला जागायला जागा उरणार नाही. त्यामुळे आपल्यावर कारवाई करण्याची धमकी देऊन मोर्ये यांनी अशा पोकळ धमक्या देऊ नयेत.प्रकाश मौर्य यांचा जिल्हा बँकेत जो पराभव झाला त्याला कारण म्हणजे सर्वोदय पतसंस्थेमध्ये त्यानी केलेला भोंगळ आणि बोगस कारभार हेच आहे. हे आम्ही वेळोवेळी वरिष्ठांना सांगून पण त्यांनी त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे जिल्हा बँकेच्या पराभव नंतर जनता सर्वोदयच्या या निवडणुकीत सुद्धा प्रकाश मोर्येना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.जर तुमच्यात हिम्मत असेल तर माझ्यावर कायदेशीर कारवाई करून दाखवाच. मात्र तुमची सर्व कुंडली बाहेर काढल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. असाही इशारा यावेळी दिलीप माळकर यांनी प्रकाश मोर्ये यांना दिला आहे. केली आहे.

आपण वेळोवेळी विरोध केला;पण प्रकाश मोर्येची दादागिरी आणि मनमानी थांबली नाही ; दादा बेळणेकर

       या पत्रकार परिषदेत बोलताना या पॅनलचे उमेदवार आणी विद्यमान संचालक दादा बेळणेकर म्हणाले प्रकाश मोर्ये म्हणाले,गेले आपल्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत मी संचालक म्हणून काम केले.पण विद्यमान अध्यक्ष प्रकाश जगन्नाथ मोर्ये यांनी मोठ्या प्रमाणात मनमानी कारभार केला.तर सर्वोदय पतसंस्थेच्या  मासिक सभेत इतिवृत्त लिहिलं जायचं आणि आपल्या सह्या घेताना थोडी जागा ठेवली जायची. त्या जागेमध्ये वाटेल तसे ठराव घातले जायचे. त्यामुळे आम्हाला तांत्रिक व कायदेशीरदृष्ट्या अडकून ठेवण्याचे प्रयत्न विद्यमान अध्यक्ष प्रकाश मोर्ये आणि व्यवस्थापकानी केले.मात्र मी कधीच त्यांना घाबरलो नाही. वेळोवेळी विरोध केला. मात्र आपल्याला जीवे मारण्यापर्यंत धमक्या देण्यात आल्या. त्या संदर्भात आपण कुडाळ पोलीस ठाण्यात देखील तक्रारी केल्या आहेत. सहकार क्षेत्रात तक्रारी करून देखील त्याची दखल घेतली गेली नाही.याचे फार दुःख वाटते. परंतु अशा पद्धतीने सहकार क्षेत्रात मनमानी करणाऱ्या प्रकाश मोर्येसह त्यांच्या इतर सर्व उमेदवारांना सर्वोदय पदसंस्थेचे सभासद जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाहीत. असाही इशारा दादा बेळणेकर यांनी दिला आहे. या अशा कारभाराला आळा घालायचा आणी बसवायचं असेल तर प्रकाश मोर्ये यांना घरी पाठवा. असे भावनिक आव्हानही दादा बेळणेकर यांनी या पत्रकार परिषदेत केले आहे.यावेळी या पॅनलचे प्रमुख सगुण धुरी,दिलीप माळकर,दादा बेळणेकर,विनोद जाधव,समिर दळवी आदी उपस्थित होते.