
कणकवली : विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेणे महत्त्वाचे असून त्याचबरोबर मानवी मूल्ये व व्यवसायातील नीतिमत्व जपली पाहिजे. आज आपण फार्मसीस्ट होऊन बाहेर पडत असताना अनेक प्रकारचे दुर्धर आजार आज होत असताना त्यावर आपल्या पदवीचा उपयोग करून या आजारावर चांगले उपचार व्हावेत यासाठी संशोधन करणे गरजेच असून फार्मसी क्षेत्र कधीही न थांबणारे असल्याने कुठेही काम करताना ध्येय ठेऊन काम केले पाहिजे असे मार्गदर्शन सेवानिवृत्त शल्य चिकित्सक डाॅ. आर.एस.कुलकर्णी यानी केले. ते कणकवली तालुक्यातील सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटी संचलित श्री सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, तोंडवलीच्या दीक्षांत समारंभ सोहळ्यात बोलत होते.
कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन सेवानिवृत्त शल्य चिकित्सक डॉ आर. एस. कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ विजय जगताप, तसेच संस्थेचे सेक्रेटरी निखिल सावंत, प्रशासकीय अधिकारी विनायक चव्हाण, प्राचार्य डॉ. तुकाराम केदार आदींसह प्राध्यापक व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच डॉ विजय जगताप सर यांनी फार्मसी क्षेत्रातील नवनवीन नोकरी च्या संधी सांगितल्या. प्राचार्य डॉ तुकाराम केदार यांनी संधी आपण ओळखायला शिकण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.संस्थेचे सेक्रेटरी निखिल सावंत सर यांनी सकारात्मक दृष्टिकोनाचे जीवनातील महत्व या विषयावर मार्गदर्शन केले.या समारंभात ५५ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये बी. फार्मसी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाने दिलेल्या पदव्या यावेळी स मारंभपूर्वक प्रदान करण्यात आल्या. दुपारच्या सत्रात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा झाला.सूत्रसंचालन प्रा. सिल्वी गोंसालविस मॅडम तर आभार प्रदर्शन प्रा. उज्ज्वला खेडकर मॅडम यांनी केले.