
मालवण : मालवणात बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील अंतर्गत वाद उफाळून आले आहेत. बाळासाहेबांच्या जयंती दिनीच ही वादाची ठिणगी पडली आहे. पक्षाच्या कार्यलयाबाहेर असलेला पक्षाचा बॅनर यावेळी फाडण्यात आला. तर या वादातून पक्ष कार्यलयालाही टाळे ठोकण्यात आले. या घटनेची मालवणात उलट सुलट चर्चा सुरु होती.
दरम्यान, आज घडलेला प्रकार पक्षाच्या वरिष्ठांच्या कानावर गेला असून पक्ष काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.