कणकवली न.पं.मधील विषय समिती नेमण्यावरून वादंग

Edited by: उमेश बुचडे
Published on: February 10, 2026 12:57 PM
views 299  views

कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीनंतर आज विषय समिती सभापती निवडीची सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र यावेळी सताधारी गटनेते रुपेश नार्वेकर यांनी समित्या नेमण्यात येऊ नयेत असे निवेदन दिले. त्यावर विरोधी गटनेते यांनी यावर आक्षेप घेत समित्या नेमण्यात याव्यात असे सांगितली. यावर गौरी पाटील यांनी यावर मतदान घेतले.

त्यावेळी समान मते मिळाल्याने चिठी द्वारे निर्णय घेण्यात आला. यात समित्या न नेमण्यात याव्यात असा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर स्थायी समिती गठीत करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. मात्र स्वीकृत नगरसेवक बंडू हर्णे यांनी यावर आक्षेप घेत  समित्या स्थापन नसल्याने आपण स्थायी समिती स्थापन करू शकत नाही असे सांगितले. भाजप आणि शहर विकासाकडे या दोन्ही पक्षांमध्ये खडाजंगी झाली. यावर पिठासीन अधिकारी गौरी पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय देण्यात येईल असे सांगितले. यामुळे सभा काही वेळ स्थगित करण्यात आली. 

पिठासीन अधिकारी गौरी पाटील, नगराध्यक्ष संदेश पारकर उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, गटनेते राधाकृष्ण उर्फ रुपेश नार्वेकर, नगरसेवक संकेत नाईक, जयेश धुमाळे, लूकेश कांबळे, बाळू पारकर, जुई मुरकर, सुमेधा अंधारी, दीपिका जाधव, भाजपच्या गटनेत्या सुप्रिया नलावडे, नगरसेवक राकेश राणे स्वप्निल राणे संजय कामतेकर बंडू हर्णे मेघा गांगण मेगा सावंत आर्या राणे, प्रतीक्षा सावंत मनस्वी ठाणेकर व नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.