'आयुष्यमान भव'साठी विद्यार्थ्यांचे योगदान अनमोल : जिल्हाधिकारी तावडे

साप्ताहिक आरोग्य मेळाव्याचा शुभारंभ
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: October 26, 2023 12:27 PM
views 96  views

कुडाळ : प्रधानमंत्री जन आरोग्य दूत म्हणून यापुढे आपण आयुष्यमान भव योजनेचा प्रसार व प्रसिद्धी करणार आहात, सर्वसामान्य नागरिकांपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांचे योगदान अनमोल ठरणार आहे,  या योजनेचा सर्वसामान्यांना लाभ मिळावा यासाठी म्हणून प्रशासनाच्यावतीने आपल्याला सहकार्य केले जाणार आहे तरी या योजनेसाठी आपले योगदान महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी आयुष्यमान भव अभियान साप्ताहिक आरोग्य मेळाव्याच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना केले.


वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ प्रशालेत आयुष्यमान भव योजनेच्या साप्ताहिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याला जिल्हाधिकारी किशोर तावडे, प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, कुडाळ गटविकास अधिकारी विजय चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी संदेश कांबळे, संचालक पदाधिकारी नागेंद्र परब, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, ही योजना सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारी आहे, सर्वसामान्यांना आरोग्याच्या संकटासोबत आर्थिक संकट ही उडवण्याची दाट शक्यता असते,  तर या मेळाव्या दरम्यान बोलताना घडवल्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांनी सांगितले की ही योजना सर्वसामान्यांसाठी जरी असली तरी त्याचा लाभ घेण्याची वेळ कोणावरही येऊ नये नागरिक तंदुरुस्त राहावे अशी प्रार्थना ही त्यांनी यावेळी केली.

 कुडाळ तालुक्यातील 25  माध्यमिक विद्यालय व नर्सिंग कॉलेजमध्ये आयुष्यमान भव योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. तालुक्यातील 6800 विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आयुष्यमान भव या योजनेचा लाभ पोहोचवला जाणार आहे, तर पुढील आठवड्याभरात 50 हजार लाभार्थ्यांपर्यंत ही योजना पोहोचवली जाणार आहे अशी माहिती आभार मानताना डॉ. संदेश कांबळे यांनी दिली.

यावेळी जिल्ह्यातील पहिल्या पंतप्रधान जन आरोग्य दूत म्हणून रोहिनी पवार 12 वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थिनीची नेमणूक करत जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते तिला पुष्पगुच्छ देत सन्मानित करण्यात आले.

 सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आरोग्य विभाग पंचायत समिती कुडाळ आणि बॅरिस्टर नागपंच शिक्षण संस्था कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयुष्यमान भव विद्यार्थी प्रशिक्षण कार्यक्रमाचे जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, तहसीलदार अमोल फाटक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, तालुका आरोग्य अधिकारी संदेश कांबळे, तर बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर उपस्थित होते तर यावेळी जिल्ह्यातील दुसऱ्या प्रधानमंत्री जन आरोग्य दूत म्हणून समीक्षा शशिकांत घाडी या विद्यार्थिनीची नेमणूक करण्यात आली.