
सावंतवाडी : २६ जानेवारी २०२३ प्रजासत्ताक दिनानिमित्त 'स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल' सावंतवाडी, बांदा व कुडाळ तसेच, 'वाॅव किड्स रायन प्री स्कूल', सावंतवाडी, शाळेचे संचालक ऋजुल पाटणकर यांनी माऊली कर्णबधिर, मतिमंद विद्यालय, कोंडूरे व वेद पाठशाळा, सावंतवाडी येथे 'थोडे द्या, खूप मदत करा!' असे अन्नदान शिबिराचे आयोजन केले होते. तरी बऱ्याच पालकांनी किराणा वस्तूंचे दान करण्यास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.
या अन्नदान शिबिराच्या निमित्ताने पालकांनी तांदूळ- १६० किलो, गहू - १०० किलो, साखर - ४५ किलो, पोहे - ३५ किलो, कडधान्य - ४० किलो, गोडतेल - २० लिटर, बिस्कीट पुडे - १०० नग, रवा - ५ किलो, गहू पीठ - ३५ किलो, डाळ - ८ किलो, मीठ - ५ किलो, कोलगेट - १० नग, नारळ - ५ नग हे खाद्यपदार्थ देऊ केले व संस्थेतर्फे आयोजित केलेल्या या शिबिराद्वारे मोठ्या प्रमाणात अन्नदान करून मोलाचे सहकार्य केले.