
वेंगुर्ला : वेंगुर्ला नगरपरिषदेचे नूतन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांची तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने भेट घेऊन शहरात स्वागत केले.
यावेळी वेंगुर्ला नगरपरिषद हद्दितील मुख्य ओहोळातील पाणी कमी झालेले असून त्यातील पाणी अडविण्यासाठी लवकरात लवकर बांध घालणे आवश्यक आहे, जेणेकरून शहरातील विहिरींची पाणी पातळी टिकण्यास त्याची मदत होईल अन्यथा शहरातील नागरिकांना भविष्यात पाणी टंचाई जाणवू शकते. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे आपण नगरपरिषदे मार्फत भटवाडी, महाजनवाडी, साकव पुलाजवळ तसेच सुंदर भाटले अशा ठिकाणी जे पाणी अडविण्यासाठी जे बांध घालतो ते लवकरात लवकर घालावे ही विनंती निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी तालुकाध्यक्ष विधाता सावंत, शहर अध्यक्ष प्रकाश डीचोलकर, माजी नगरसेवक कृतिका कुबल, दादा सोकटे आदी उपस्थित होते.