
सिंधुदुर्गनगरी : युपीए सरकारने २०१३ मध्ये वक्फ कायद्यात केलेली सुधारणा चुकीचीच होती म्हणूनच आता २०२५ मध्ये वक्फ विधेयक संसदेत मंजूर होत असताना काँग सच्या नेत्यांनी मौन बाळगले, मात्र लोकांना दाखविण्यासाठी संसदेबाहेर जाऊन या विधेयकाला विरोध करायचा ही त्याची दुटप्पी भूमिका आहे खरी भूमिका त्यांनी जाहीर करावी असे आव्हान भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी पत्रकार परिषद मध्ये बोलताना दिले व वफ कायद्यातील सुधारणा ही सर्वांनाच न्याय मिळवून देणारी आहे असे त्यांनी सांगितले.
येथील पत्रकार भवन मध्ये पत्रकार परिषद माधव भंडारी यानी आयोजित केली होती, यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी जि. प. उपाध्यक्ष रणजीत देसाई, राजू राऊळ उपस्थित होते.
भाजपा सरकारने वक्फ कायद्यात बदल करताना चिकित्सक तज्ज्ञाकडून सूचना घेण्यात आल्या त्यावर प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. अनेक प्रश्नही उपस्थित झाले आणि त्याचे निर्सनही केले गेले राजकीय प्रश्न सुद्धा निर्माण केले गेले, त्यानंतरच संसदेच्या सभागृहात वक्फ विधेयक सुधारणा कायदा ठेवला गेला आणि त्याला मंजुरी मिळाली. मात्र वक्फ कायदा मंजूर होत असताना काँग्रेस नेत्यांनी जी भूमिका बजावली त्यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
२०१३ मध्ये युपीए सरकारने वक्फ कायद्यात सुधारणा केली त्यावेळी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, जयराम रमेश तसेच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे यासारखी नेते मंडळी संसदेच्या सभागृहात होती आणि आज २०२५ मध्ये वक्फ कायद्यात सुधारणा मांडले जात असतांना सुद्धा हीच काँग्रेस नेते मंडळी सभागृहात होती. परंतू यावेळी वक्फ कायदा सुधारणा मांडत असतांना काहीच न बोलता मौन बाळगले होते. खरतर २०१३ मध्ये युपीए सरकारने वक्फ कायद्यात सुधारणा केल्यानंतर पुन्हा या कायद्यात सुधारणा होत असताना या काँग्रेस नेते मंडळींनी आपली भूमिका मांडणे ही त्यांची जबाबदारी होती, परंतु या मंडळींनी चकार शब्द काढला नाही, यावरुन त्यांच्याच सरकारने २०१३ मध्ये मांडलेले विध्येयक चुकीचे होते, ही त्यांची खात्री होती. म्हणूनच ते गप्प राहीले. प्रियांका गांधी तर संसदेमध्ये फिरकलेच नाही. मतदानापासुन दूर राहीलेल्या ग्रामगचे कारण त्यांनी द्यायलाच हवे
२०२५ च्या वक्फ कायदा मंजूर होत असतांना मौन बाळगणाऱ्या काँग्रेस नेतेमंडळींनी मात्र सभागृहाबाहेर आल्यानंतर वक्फ कायदा विरोधात बोलायला सुरुवात केली, लोकांना दाखविण्यासाठी गळा काढून कायद्याविरोधात बोलत होते. मुस्लीम समाजाबद्दल प्रेम असल्याचे दाखविले जात होते. खरंतर वक्फ बोर्ड हा केवळ मुस्लीमांसाठी नसून शीख, खिश्चन, पारसी अशा सर्व अल्पसंख्यांक समुदायासाठी आहे. मुस्त्रीम वगळता सर्वच समुदायाने वक्फ विधेयक मुंजरीसाठी पाठींबा दिलेला आहे. मुस्लीम समुदाच सोडून अन्य समुदायाकडे सहानभूतीने यघण्याची मानसिकता काँग्रेस नेते मंडळीकडे नाही म्हणूनच वयफ विधेयकाच्या बाबतीत केवळ मुस्लीमांना बर बाटावं यासाठी सभागृहाबाहेर येऊन गळा काढण्याचा प्रयत्न काँग्रेस नेत्यांनी केलेला आहे. त्यामुळे कॉंग्रेस नेत्यांनी सभागृहामध्ये एक भूमिका आणि सभागृहाबाहेर एक भूमिका घेतलेली आहे. या भूमिकेबाबत त्यांनी स्पष्टीकरण द्यायला हवे, नेमकी त्यांची काय भूमिका आहे हे लोकांना समले पाहिजे, याबाबत त्यांनी जाहीर पणे भूमिका स्पष्ट करावी असे आव्हान भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी बोलताना दिले.
वक्फ बोर्डावर आता दोन महिला सदस्यांना घ्यायचे आहे. परंतू त्यालाही विरोध केला जात आहे. खरंतर महिलांना ५० टक्के प्राधान्य प्रत्येक ठिकाणी दिले जाते असे असतांना वक्फ, बोडविर दोन महिला सदस्यांना घ्यायला विरोध करणे योग्य नाही. आणि त्या महिला सदस्य घेताना मुस्लीम समाजाचाच घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे विरोध करणे चुकीचेच आहे. बिगर मुस्लीम दोन सदस्य सुद्धा घेतले जाणार आहेत, त्यालाही विरोध सुरु केलेला आहे, अशा प्रकारे काँग्रेस नेतेमंडळींनी वक्फ विधेयकाच्या बाबतीत वेगवेगळ्या भूमिका घेतल्या असून त्यांनी खरी भूमिका जनतेसमोर मांडावी आणि जनतेला उत्तर द्यावे असे आवाहन केले आहे.