जीएसटी दरकपातीवर काँग्रेसची टीका

Edited by:
Published on: September 23, 2025 18:49 PM
views 49  views

सिंधुदुर्ग : केंद्र सरकारकडून काही वस्तूंवरील जीएसटी दर कमी केल्याच्या निर्णयावर सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख यांनी पत्रकारांना दिलेल्या निवेदनात सरकारच्या या उपक्रमाला “जनतेची दिशाभूल करणारा” असा आरोप केला.

शेख यांनी सांगितले की, 2017 मध्ये लागू केलेल्या जीएसटीमुळे सुरुवातीला काही वस्तूंवर 28 टक्के करदर लागू होता. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यावेळी या करप्रणालीला विरोध दर्शवत दर कमी करण्याची मागणी केली होती. शेख यांच्या म्हणण्यानुसार, “आठ वर्षांच्या संघर्षानंतर आता दर 18 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले असले तरी सुरुवातीच्या कालावधीत जादा कर आकारला गेला.”

काँग्रेसकडून असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे की, “दरकपातीनंतर ‘जीएसटी बचत उत्सव’ साजरा केला जात आहे, मात्र सुरुवातीच्या काळात गेल्या ८ वर्षात वाढीव करामुळे जनतेच्या झालेल्या आर्थिक परिणामांविषयी सरकारने स्पष्टीकरण द्यावे.” असेही त्यांनी म्हटले आहे.