
दोडामार्ग : राज्यत विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काय परिस्थिती आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी महिला वर्ग मोठ्या ताकदीने काम करत आहे. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेस अद्याप जिवंत आहे. आणि विधानसभा निवडणुकीत आपण नक्कीच विजयी होऊ शकतो असा विश्वास काँग्रेसच्या राजस्थानच्या आमदार प्रीती शक्तावत यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
दोडामार्ग सोनचाफा येथील राष्ट्रीय काँग्रेच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांच्या सोबत महाराष्ट्र काँग्रेसच्या महिला ऑब्जवर रूपाली कापसे, सिंधुदुर्ग जिल्हा महिलाजिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी दोडामार्ग तालुकाध्यक्ष वासुदेव नाईक सुभाश दळवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार प्रीती शक्तावत बोलताना म्हणाल्या की दिल्लीतुन आम्हाला या सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची ताकत काय आहे कशा प्रकारे संघटना वाढीचे काम पदाधिकारी करत आहे याच सर्वे करण्यासाठी आम्ही याठिकाणी आलो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात महिला वर्ग मोठ्या जोमाने काम करीत आहे हे आज आम्हाला लक्षात आले आहे. अजून कशा प्रकारे काँग्रेस मजबूत करण्यात येईल यासाठी आम्ही प्रयन्त करणार आहोत.
ही सिंधुदुर्ग वासियांसाठी लाजिरवाणी गोष्ट
दरम्यान आमदार प्रीती शक्तावत म्हणाल्या की आझादी वेळी काँग्रेसने आपले प्राण पणाला लावले. सिंधुदुर्गातील राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळून पडला ज्यांना आपण आराध्य दैवत मानतो त्या महाराजांच्या पुतळा उभारणीत मोठा भ्रष्टाचार केला जातं आहे. नंतर पुतळा कोसळण्यावरून माफी मागितली जातं आहे. केवळ माफी मागितली तर समाधान होते काय ही सिंधुदुर्गवासि्यांसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
पक्षाने आदेश दिल्यास निवडणूक लढवण्यास तयार : महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी
जिल्ह्यात काँग्रेस पक्ष अजूनही सक्रिय आहे. दिल्लीतुन आज या जिल्ह्यात संघटना मजबुती संदर्भात सर्वे केला जात आहे आणि महिला वर्ग मोठ्या संखेने काम करीत आहे. या सर्व धरतीवर पक्ष प्रमुखांनी विधानसभा लढवण्यास मंजुरी दिली तर नक्कीच मी निवडणूक लढविणार असे वंजारी यांनी स्पष्ट केले.