तहसिलदार श्रीधर पाटील यांचे शिवसेनेच्यावतीने अभिनंदन...!

Edited by: विनायाक गावस
Published on: June 23, 2023 20:27 PM
views 107  views

सावंतवाडी : सावंतवाडी तालुका तहसिल कार्यालयास गेली सहा-सात महिने प्रभारी तहसिलदार कार्यरत होते. सावंतवाडी तहसिलमध्ये कायमस्वरुपी तहसिलदार कार्यरत असावे अशी मागणी होती. त्यानुसार श्रीधर पाटील यांची कायमस्वरुपी तहसिलदार पदी नेमणूक करण्यात आली.

शिवसेना पक्षाच्यावतीने नवनियुक्त तहसिलदार श्रीधर पाटील यांचे शिवसेना पक्षाच्यावतीने पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, महीला आघाडी जिल्हाप्रमुख अॅड. सौ. निता सावंत- कविटकर, सावंतवाडी तालुका प्रमुख नारायण राणे, माजी नगराध्यक्ष श्रीम. अनारोजीन लोबो, शिवसेना शहर महीला आघाडी प्रमुख सौ. भारती मोरे, श्री. गजानन नाटेकर, विभागप्रमुख श्री. पप्पू सावंत, सौ. जयश्री ठाकूर, सौ. सायली होडावडेकर, श्री. शिवप्रसाद कोळंबेकर, श्री. एकनाथ हळदणकर, श्री. विश्वास घाग, श्री. पांडुरंग नाईक, आदी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.