
वेंगुर्ला : पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या शिफारशीनुसार वेंगुर्ले नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष राजन गिरप यांची सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीवर निवड झाल्याबद्दल भाजपा च्या वतीने सावंतवाडी विधानसभा प्रमुख व माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .
भाजपा महाराष्ट्र आयोजीत " नमो चषक "भव्य क्रिडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या वेंगुर्ले तालुक्याच्या नियोजनाची बैठक राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत युवा मोर्चा व बेसिक यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी रेडी, उभादांडा, तुळस, आडेली, म्हापण इत्यादी पाच जि. प. मतदार संघात व वेंगुर्ले शहरात स्पर्धेचे नियोजन करण्यात आले. तसेच विविध समीत्या स्थापन करून जबाबदारी सोपविण्यात आली.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा उपाध्यक्ष अँड. सुषमा खानोलकर, जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक, अणसुर सरपंच सत्याविजय गावडे, सुनील मठकर, गणेश मनोहर गावडे, प्रितम जगन्नाथ सावंत, तुषार साळगांवकर, युवा मोर्चा अध्यक्ष प्रसाद कृष्णा पाटकर, पालकरवाडी सरपंच बंड्या पाटील, नितीन चव्हाण, माजी सभापती निलेश सामंत, क्रिडा प्रकोष्ठ निशांत तोरसकर, नमो चषक संयोजक हेमंत गावडे, हितेश धुरी, तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, ता.चिटणीस समीर कुडाळकर, वैभव होडावाडेकर, भूषण सारंग, वृंदा गावंडळकर, भूषण आंगचेकर, प्रणव वायंगणकर, शशिकांत करंगूटकर, रुत्विक आंगचेकर , बुथप्रमुख सुधीर पालयेकर, श्रीकृष्ण परब व अमेय धुरी, बुथप्रमुख शेखर सुरेश काणेकर, आसोली उपसरपंच संकेत संदीप धुरी, शक्तिकेंद्र प्रमुख श्यामसुंदर मुननकर, मारुती दोडानशेट्टी, सरपंच संघटना अध्यक्ष पप्पू परब, रविंद्र शिरसाट, हर्षद साळगावकर, कमलेश गावडे, जगन्नाथ राणे इत्यादी उपस्थित होते.