
वेंगुर्ला : विधानसभा निवडणुकीत कोकण विभागातील महायुतीच्या ३९ पैकी ३५ जागा निवडणून आणणारे किगमेकर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे वेंगुर्ला तालुका भाजपातर्फे सदिच्छा भेट घेऊन विशेष अभिनंदन केले.
कोकण विभागातील पालघर ते सावंतवाडी अशा ३९ विधानसभांची जबाबदारी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. प्रचार यंत्रणेत स्वतःला झोकून घेत काटेकोर नियोजन करीत आणि बंडखोरी मोडून काढत भाजपासहीत मित्रपक्षांचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आणले. या विजयाचे श्रेय त्यांना देण्यासाठी वेंगुर्ला येथील भाजपाच्या प्रमुख पदाधिका-यांनी मुंबई येथील ‘रायगड‘ या शासकीय निवासस्थानी त्यांची भेट घेत अभिनंदन केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, तालुका सरचिटणीस प्रशांत खानोलकर, ज्येष्ठ नेते राजू राऊळ आदी उपस्थित होते.