BREAKING ; इथं गांजा जप्त ; पोलिसांची धडक कारवाई

Edited by: दिपेश परब
Published on: August 16, 2023 11:39 AM
views 206  views

वेंगुर्ला :  रेडी सुकळभाटवाडी येथे वेंगुर्ला पोलिसांनी १५ ऑगस्ट रोजी  रात्री १० वाजण्याच्या सुमारास बेकायदेशीररित्या गांजा विक्रीवर धडक कारवाई केली.

यात गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःकडे बाळगल्या प्रकरणी रेडी सुकळभाटवाडी येथीलच वैशाली प्रकाश आसोलकर (वय ३५) हिच्याकडून ६३६ ग्रॅम वजनाचा एकूण अंदाजे २० हजार रुपये किमतीचा गांजा हा अमली पदार्थ  वेंगुर्ला पोलिसांनी जप्त केला आहे. दरम्यान वैशाली असोलकर हिच्यावर वेंगुर्ला पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या जाधव करीत आहेत.