शिवसेना सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे संपर्कप्रमुख शैलेश परब यांना मातृशोक

Edited by: संदीप देसाई
Published on: June 07, 2023 20:16 PM
views 165  views

सावंतवाडी : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख आणि मुंबई मनपाचे नगरसेवक शैलेश परब यांची आई श्रीमती शैलेजा दत्ताराम परब वय 80 (मुळ कांदळगाव ता. मालवण,सध्या अंधेरी मुंबई )यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंधेरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

गेले काही दिवस त्या आजारी होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांच्या त्या मानलेल्या बहीण होत.