आरवली माजी सरपंच मयूर आरोलकर यांना पितृशोक

Edited by: दिपेश परब
Published on: August 11, 2023 20:10 PM
views 84  views

वेंगुर्ले : आरवली देऊळवाडी येथील रहिवासी, वेंगुर्ले तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष व आरवली येथील श्रीदेव वेतोबा देवस्थानचे सेवेकरी गुरुनाथ सावळाराम आरोलकर (९०) यांचे बुधवार दि. ९ ऑगस्ट रोजी रात्रौ ११ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुलगे, १ मुली, सुना, जावई, १ भाऊ, पुतणे, भाचे, भाच्या, नातवंडे असा परिवार आहे. 

  वेंगुर्ले तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस तथा आरवली ग्रामपंचायतचे माजी सरपंच मयूर गुरुनाथ आरोलकर यांचे ते वडील होत.