पत्रकार दत्तप्रसाद पोकळे यांना मातृशोक

Edited by: विनायक गांवस
Published on: April 16, 2024 13:00 PM
views 198  views

सावंतवाडी : असनिये कणेवाडी येथील रहिवाशी सौ. सुहासिनी उदय पोकळे (६५) यांचे मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्या सोमवारी आपल्या इन्सुली येथील माहेरी गेल्या होत्या. मात्र मंगळवारी सकाळी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. परंतु हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या आकस्मित निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत पोकळे कुटुंबीयांचे सांत्वन केले.

दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, सुन, नातवंडे असा परिवार आहे. येथील उदय पोकळे यांच्या त्या पत्नी तर पत्रकार दत्तप्रसाद पोकळे यांच्या त्या मातोश्री होत तसेच इन्सुली संजय गावडे यांची ती बहीण होत.