
वेंगुर्ला : वायंगणी - पंडितवाडी येथील रहिवासी श्रीमती प्रेमलता सावळाराम पंडित (९२) यांचे सोमवारी ३ मार्च रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सूना, तीन मुली, जावई, नातसूना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. खानोली- सुरंगपाणी येथील श्री देव विठ्ठल पंचायतनाचे व्यवस्थापक प. पू. दादा पंडित महाराज यांच्या त्या मातोश्री होत.