
कणकवली : कलमठ बिडयेवाडी येथील सावित्री महादेव नाडकर्णी (वय ९३) यांचे रविवारी सायंकाळी ७.४५ वाजता राहत्या घरी निधन झाले.बांधकाम व्यावसायिक उदय नाडकर्णी यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात एक मुलगा,बहिणी,चार मुली,सून,नातवडे असा परिवार आहे.त्यांच्या मृतदेहावर सोमवारी बिडयेवाडी येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.