फणसवडे गावठाण वेशीच्या रस्त्याचे काँक्रिटकरण | संदीप गावडे यांच्याहस्ते कामाचा शुभारंभ

Edited by: विनायक गावस
Published on: August 25, 2023 17:56 PM
views 90  views

सावंतवाडी : फणसवडे गावठाण वेशीच्या रस्त्याचे काँक्रिटकरण कामाचा शुभारंभ माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांच्या हस्ते करण्यात आला. केसरी फणसवडे ग्रा.पं वर भाजपाची निर्विवाद सत्ता आल्यावर आजवर बरीच वर्षे प्रलंबित असलेले कार्य आज मार्गी लागले. या कामासाठी निधी मंजूर करणारे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे संदीप गावडे यांनी आभार मानले. फणसवडे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी फणसवडे भाजपा कटिबद्ध आहे असं ते म्हणाले. यावेळी सरपंच स्नेहल कासले, उपसरपंच संदिप पाटील, सर्व सदस्य व फणसवडे ग्रामस्थ उपस्थित होते.