मांगवलीतील मधुकर भुर्के विद्यालयाला संगणक- लॅपटॉप प्रदान

कोरेगाव पार्क पुणे येथील 'मे. मिलीनियम स्पिरीट्स प्रायव्हेट लिमिटेड' कंपनीचा उपक्रम
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: January 29, 2024 13:43 PM
views 207  views

वैभववाडी : मांगवली राणेवाडी येथील मोहन जितेंद्र राणे यांनी कोंकण विद्या प्रसारक मंडळ, मुंबई संचलित मधुकर सीताराम भुर्के माध्यमिक विद्यालयाला चार संगणक आणि एक लॅपटॉप दिला. पुण्यातील कोरेगाव पार्क येथील 'मे. मिलीनियम स्पिरीट्स प्रायव्हेट लिमिटेड' कंपनीच्या 'सीएसआर' निधीमधून त्यांनी हे संगणक व लॅपटॉप मिळवून दिले असून ते प्रजासत्ताक दिनी शाळा व्यवस्थापनाला सुपूर्द केले.

विशेष म्हणजे मोहन राणे हे मधुकर भुर्के विद्यालयाचे विद्यार्थी नसून यांचे शिक्षण पुण्यात झाले. ते 'मे. मिलीनियम स्पिरीट्स प्रायव्हेट लिमिटेड' कंपनीत अकौटंट पदावर कार्यरत आहेत. तरीही जन्मभूमीसाठी काहीतरी करण्याची तळमळ आणि आपल्या गावातील शाळा व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावण्याच्या भावनेतून त्यांनी कंपनीमार्फत चार संगणक, एक लॅपटॉप मोहन राणे प्रजासत्ताक दिनी त्यांचे सहकारी महेश शिंदे यांच्या समवेत शाळेला सुपूर्द केला.

त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्रीधर राणे, उपाध्यक्ष गजानन राणे, महेश संसारे मुख्याध्यापक एस. डी. पाटील यांनी मोहन राणे व महेश शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. यावेळी सरपंच शिवाजी नाटेकर, ग्रामविकास मंडळाचे उपाध्यक्ष सुरेश राणे, माजी सरपंच राजेंद्र राणे, प्रतिष्ठित नागरिक नंदकुमार राणे, दिलीप कोलते, माजी विद्यार्थी प्रकाश काळे, तंटामुक्ती अध्यक्ष वसंत नाटेकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.