यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये कौशल्य अभ्यासक्रमाचे मॉड्यूल पूर्ण

Edited by: विनायक गांवस
Published on: August 08, 2024 12:51 PM
views 198  views

सावंतवाडी : येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये गेल्या शैक्षणिक वर्षांपासून सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य अभ्यासक्रम उपक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. यामध्ये माइनक्राफ्ट कोडिंग, आर्थिक साक्षरता, हर्बल हेरिटेज, मास्क मेकिंग अशा विविध कौशल्य प्रकारांचा समावेश होता.

या उपक्रमाचे पहिले मॉड्यूल चालू शैक्षणिक वर्षी यशस्वीपणे पूर्ण झाले. विद्यार्थ्यांनी थिअरी व प्रॅक्टिकल्स, फील्ड व्हिजिट आणि प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून सर्व बाबींची यशस्वी पूर्तता केल्यानंतर सीबीएसई बोर्डाकडून त्यांना पाच क्रेडिट पॉइंट्ससह प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारची स्किल्स विकसित व्हावीत व त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळावी हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. सर्व मोड्युल्स यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले व मुख्याध्यापिका प्रियांका देसाई यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.