'त्या' घातपातप्रकरणी सखोल चौकशीची मागणी

पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांची चव्हाण कुटुंबीयांनी घेतली भेट
Edited by: विनायक गांवस
Published on: May 15, 2023 20:26 PM
views 148  views

सावंतवाडी : कोलगाव चव्हाणवाडी येथील संतोष वासुदेव चव्हाण (वय-४२) या तरुणाचा मृतदेह कोलगाव आणि सावंतवाडी नगरपालिका हद्दीवर असलेल्या ओहोळाशेजारी सापडला होता. दरम्यान, मयत संतोषचे काका बाबुराव चव्हाण यांनी घातपातचा संशय व्यक्त केला होता. सोमवारी याबाबत त्यांनी पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांची भेट घेत 'त्या' घातपाताच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.


मयताचे काका कोलगाव सोसायटीचे संचालक बाबुराव चव्हाण, चर्मकार संघटनचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष गणेश म्हापणकर, मयताचा भाऊ सदानंद चव्हाण यांनी पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांची भेट घेत हा घातपात असल्याचा संशय व्यक्त करत याची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली. दरम्यान, मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आले आहे. तर काही अंतर्गत अवयव व्हीसेरा रिपोर्टसाठी रत्नागिरी इथ पाठविण्यात आले आहे. त्याचा रिपोर्ट लवकरच प्राप्त होईल तर कुटुंबियांच्या मागणीनुसार संबंधित घटनेची सखोल चौकशी केली जाईल अस आश्वासन यावेळी पोलिस निरीक्षकांनी दिल.