
कणकवली : अच्युत देसाई हे तज्ज्ञ आणि अनुभवी व्यक्तिमत्व गेली अनेक वर्ष स्पर्धा परीक्षा या क्षेत्रात कार्यरत आहेत. आजपर्यंत अनेक कार्यशाळांमधून त्यांनी मुलांना मार्गदर्शन केले आहे. गणित आणि बुद्धिमत्ता या सारख्या अवघड विषयातील अनेक क्लृप्त्या सहजरित्या कशा सोडवाव्यात याचे उत्तम प्रकारे मार्गदर्शन ते करतात. त्यांच्या या अनुभवाचा लाभ आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी घेतला आणि स्पर्धा परीक्षा मध्ये यश संपादन केले. ही संधी आपल्या मुलांनाही मिळावी या हेतूने आम्ही ट्रस्ट मार्फत खास इंग्रजी आणि सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी ही संधी उपलब्ध करून देत आहोत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि इतर विद्यार्थ्यांनाही शेअर करावे जेणेकरून त्यांनाही याचा लाभ मिळेल, असे आवाहन संदीप सावंत (9421235839) यांनी केले आहे.