धनगर जागर यात्रेकडे समाज बांधवांची पाठ !

सभागृहात बऱ्याच खुर्च्या रिकामी
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: October 17, 2023 14:56 PM
views 290  views

सिंधुदुर्गनगरी : धनगर समाज यात्रेनिमित्त आमदार गोपीचंद पडळकर सिंधुदुर्ग नगरी येथे सभेसाठी दाखल झाले आहेत. मात्र या सभेला समाज बांधवांनी पाठ फिरवलेली पाहायला मिळाली.

200 हुन माणसांसाठी बसण्याची व्यवस्था केलेल्या सभागृहात बऱ्याच खुर्च्या यावेळी रिकामी पाहायला मिळाल्या. तर दुसरीकडे या आधीच उशिराने दाखल झालेल्या पडळकर यांच्याबाबत तीव्र नाराजी पाहायला मिळाली. तर मार्गदर्शनासाठी आलेल्या पडळकर यांच्या सभेकडे चक्क समाजबांधवांनीच पाठ फिरवलेलं चित्रही यादरम्यान पाहायला मिळाले.