इथल्या शेतकऱ्याला सहकार्य करण्यासाठी कटीबद्ध : मनिष दळवी

Edited by:
Published on: February 16, 2024 13:34 PM
views 64  views

सिंधुदुर्ग : भविष्यामध्ये गावातील ६५ टक्के आर्थिक व्यवहार हे फक्त विकास संस्थांच्या माध्यमातून होणार आहेत. या सगळ्यांमध्ये शासनाच्या वेगवेगळ्या योजनांमार्फत संबंधित  ग्राहक या पुढच्या काळामध्ये जिल्हा बँकांशी जोडला जाईल.विकास संस्थांचाही प्रत्येक ग्राहकाला जिल्हा बँकांमध्ये जोडला जाईल.आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये जिल्हा बँकेची जबाबदारी सुद्धा तेवढीच मोठी असणार आहे आणि म्हणून या सगळ्या भविष्यातील जबाबदारीची जाणीव ठेवून आम्ही त्या ठिकाणी डिजिटल बँकिंगच्या माध्यमातून तात्काळ सेवा आपल्यापर्यंत पोचली पाहिजे तसेच नॅशनलाईज किंवा खाजगी बँकांच्या पटीमध्ये किंवा त्यांच्या शर्यतीमध्ये आपल्या ग्राहकाला वाटलं पाहिजे की जिल्हा बँक त्यांच्यापेक्षा चांगली सेवा जिल्हा बँक मला देते आहे. कारण जिल्हा बँक शेवटी जिल्हावासीयांची  जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची आहे. आणि तुमची आमची असलेली हि बँक आपणच मोठी केली पाहिजे. ही बँक मोठी करण्यासाठी तुमच्या पर्यंत तेवढ्याच चांगल्या सेवा सुविधा आम्ही ग्राहकांवा देउ अशी ग्वाही जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी मळगांव येथे दिली.                                                                                                                           

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या  मळगांव शाखा नुतन इमारतीचा स्थलांतर सोहळा  संपन्न झाला. नुतन शाखा इमारत स्थलांतर सोहळ्याचे उद्घाटन नाबार्ड चे अध्यक्ष के.वी.शाजी यांच्या हस्ते फलकाचे अनावरण करण्यात आले.यावेळी प्रमुख उपस्थिती जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर बँक संचालक मळगांव सरपंच हणुमंत पेडणेकर, वेत्ये ग्रामपंचायत सरपंच गुनाजी गावडे, निरवडे ग्रामपंचायत सरपंचाश्रीम. सुहासिनी गावडे,न्हावेली ग्रामपंचायत सरपंच अष्टविनायक धाउसकर,पं.स. सावंतवाडी माजी सभापती राजेंद्र परब वेत्ये वि.सोसा.अध्यक्ष रमेश गावकर ,श्री देवी सातेरी महिला वि.सोसा.निरवडे च्या अध्यक्षा स्नेहल बांदिवडेकर, न्हावेली ग्रुप वि.सोसा. अध्यक्ष भरत धाऊस्कर, सोनुर्ली वि. सोसा.अध्यक्ष दिलीप गावकर माऊली महि.बहु.औद्यो.सह. संस्था न्हावेलीचे उपाध्यक्ष भावना धाउसकर, जिल्हा बँकेचे मुख्य कार्य अधिकारी प्रमोद गावडे, पी डी सामंत, देवानंद लोकेगावकर, मळगांव शाखा व्यवस्थापक सजीवन तुळसकर तालुका विकास संजय डंबे, विश्वनाथ डोर्लेकर,जिल्हा बँकेचे अधिकारी, कर्मचारी,मळगांव चे ग्रामस्थ, ग्राहक, ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.                     

यावेळी बोलतांना नाबार्ड अध्यक्ष के व्ही शाजी यांनी सांगीतले भारत हा विकसनशील देश आहे.आपला देश वेगाने प्रगती करत आहे.तो अधिक विकसीत होण्याासाठी पर कँपीटल वाढंवलं पाहीजे. सहकारातूनच हे शक्य करता येईल.सिधुदुर्ग जिल्हा बँक चांगलं काम करत आहे. गावातील लोकांच्या इच्छेनुसार योजना राबविल्या गेल्या पाहीजेत.डिजीटल सुविधा जिल्हा बँके मार्फत दिल्या जात आहे त्याला नाबार्डचे नेहमीच सहकार्य करेल व बँकेच्या पाठीशी राहील.सहकार शेत्राची जी काही मागणी आहे ती पूर्ण केली जाईल येथील बचत खाती पँक्स मार्फत उघडण्यात यावीत.येथील लोकांचा लाईफ स्टाइल त्यामुळे निच्छित बदलली जाईल असे शेवटी के व्ही शाजी म्हणाले.     

जिल्हा बँक उपाध्यश अतुल काळसेकर यांनी  मळगांव गावाचा नविन सावंतवाडी असा उल्लेख करत  मळगांव गाव वेगाने विकसीत होत असल्याचे सांगीतले. जिल्हा बँक सामान्यतल्या सामान्याच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. येथील नविन जागेत ही शाखा मनिष दळवी यांनी दुरदृष्टी ठेउन स्थलांतरीत केली आहे त्यांना मी धन्यवाद देतो असे अतुल काळसेकर यावेळी म्हणाले.   

मळगांव शाखेचे जुने जागानालक संजय नाटेकर, नविन जागा मालक प्रकाश सबनीस यांचा जिल्हा बँक अध्यश मनिष दळवी यांच्या हस्ते शाल श्रीफळ देउन सत्कार करण्यात आला.तर स्थलांतर सोहळा कार्यक्रमाचे सुत्र संचालन शरद सावंत यांनी केले