
वेंगुर्ले : आसोली गावचा सर्वांगीण विकास खऱ्या अर्थाने गावात किती सोयी सुविधा उपलब्ध आहेत यावर अवलंबून आहे. गावात पायाभूत सुविधांचा असलेला अभाव दूर करण्यासाठी मी कटिबद्ध असेल. ग्रामस्थांनी कोणत्याही समस्या असल्यास मला नक्की आवर्जून हक्काने सांगा असा विश्वास भाजप युवामोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा श्री नारायण विद्यामंदिर आसोली नंबर १च्या शतक महोत्सव कार्यक्रमया वेळी व्यक्त केला.
आसोली विकास मंडळ, मुंबई आणि शतक महोत्सव कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा श्री नारायण विद्यामंदिर आसोली नंबर १ चा शतक महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून युवा उद्योजक तथा भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब उपस्थित होते. याप्रसंगी त्यांनी स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधत शतक महोत्सवाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, मेघशाम नाडकर्णी, भालचंद्र दिक्षित, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर, सदानंद गावडे, दिनकर नागवेकर, विश्वनाथ धुरी, सरपंच बाबा जाधव, उदय धुरी, संजय गावडे, सुजाता देसाई, सुधीर आसोलकर, विजय धुरी, सुरेश धुरी, प्रसाद गावडे, प्रकाश रेगे, भास्कर केरकर आदी मान्यवर उपस्थित होते.