जिल्हा बँकेचा स्तुत्य उपक्रम ; ग्रा.पं.ना क्युआर कोड

Edited by: विनायक गावस
Published on: August 14, 2023 17:40 PM
views 324  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेकडुन अजुन एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला आहे. सावंतवाडी तालुक्यात एकुण ६३ ग्रामपंचायती असुन सद्या प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी क्युआर कोड उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. यासाठी आवश्यक कागद पत्रांचा नमुना संच ग्रामपंचायतमध्ये पोहोच करण्यात आलेला आहे.

यामुळे ग्रामस्थांना नळपाणी, तसेच ग्रामनीधी खात्यांमध्ये भरणा करावयाच्या रक्कम आता क्युआर कोड मार्फत ग्रा.प.खात्यामध्ये वर्ग करता येईल. यामुळे वेळ तर वाचणार आहेच. परंतु, व्यवहारामध्ये अधिक पारदर्शकता येउन सर्वांसाठी व्यवहार सोयीचे होतील. आजपर्यंत सावंतवाडी तालुक्यातील आंबेगाव, कोलगाव, माडखोल, सरमळे, ओटवणे, सोनुर्ली, मळेवाड कोंडुरे, कारिवडे इ.ग्रामपंचायतींना  क्युआर कोड बँकेने उपलब्ध करुन दिलेले आहेत. उर्वरित ग्रामपंचायतींनी लवकरात लवकर आवश्यक कागदपत्रासह नजिकच्या सिंधुदुर्ग बँकेच्या शाखेत संपर्क साधुन क्यु आर कोड मागणी करण्याचे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक महेश सारंग यांनी केले आहे.

दरम्यान, सिंधुदूर्ग जिल्हा मध्य.बँकेचे संचालक महेश  सांरग यांच्या हस्ते सरपंच ग्रामपंचायत कारिवडे आरती अशोक माळकर यांचेकडे ग्रामपंचायत कारिवडेला क्युआर कोड वितरीत करण्यात आला आहे.