कणकवली पर्यटन महोत्सवाच्या कार्यक्रम स्थळी कामांचा शुभारंभ !

Edited by: उमेश बुचडे
Published on: January 03, 2024 16:07 PM
views 513  views

कणकवली : कणकवली पर्यटन महोत्सव २०२४ च्या महोत्सव स्थळाच्या ठिकाणी व्यासपीठ उभारणीसह अन्य कामाचा शुभारंभ राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. कणकवली पर्यटन महोत्सव ११ जानेवारी ते १४ जानेवारी या कालावधीत होणार असून, या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्यभरातले नामवंत कलाकार यांच्या सह स्थानिक कलाकारांचा देखील सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. या महोत्सवाच्या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रम स्थळी भव्य व्यासपीठ उभारले जाणार असून, या सर्वच कामांचा शुभारंभ आज करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी नगरसेवक अभिजित मुसळे, बंडू गांगण, रवींद्र गायकवाड, राजू गवाणकर, शहराध्यक्ष अण्णा कोदे, दिलीप वर्णे, ऋतिक नलावडे, पंकज पेडणेकर, नवू झेमणे, राजा पाटकर, शिवसुंदर देसाई, संदेश आर्डेकर आदी उपस्थित होते.