खरेदी विक्री संघाकडून भात खरेदीस प्रारंभ

Edited by: विनायक गावस
Published on: December 11, 2023 13:12 PM
views 222  views

सावंतवाडी : सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघात शेतकऱ्यांकडून आज भात खरेदी करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष श्री देव्या सुर्याजी यांच्या हस्ते याचा शुभारंभ करण्यात आला. २०२३-२४ साठी सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचा ह्यावर्षीच्या भात खरेदीस आजपासून श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.

युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाकडून भात खरेदी करण्यात येणार आहे.यावेळी सागर गावकर रामचंद्र चव्हाण बंड्या पवार नाना पवार अॅलेक्टन रॉड्रीक्स पंकज मडये व ग्रामीण भागातील सर्व शेतकरी वर्ग उपस्थित होते.