नाथ पै सभागृहात 'गणेश उत्सवा'चा शुभारंभ !

सावंतवाडीच्या सांस्कृतिक चळवळीला पुन्हा सुरूवात: दीपक केसरकर
Edited by: विनायक गावस
Published on: September 24, 2023 19:51 PM
views 156  views

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या माध्यमातून व इंदिरा गांधी व्यापारी संकुल, संत गाडगेबाबा भाजी मंडई, राष्ट्रीय एकात्मिक सांस्कृतिक कला-क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक गणेशोत्सव ठिकाणी 24 ते 28 सप्टेंबर या कालावधीत विविध भरगच्च कार्यक्रमांच्या आयोजन करण्यात आले आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते या सांस्कृतिक कार्यक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. बॅ. नाथ पै. सभागृहाच काम सुरु असल्यानं सांस्कृतिक चळवळ खंडीत होती. गणेशोत्सवाच्या पवित्र सणाच्या निमित्तानं पारंपरिक  ही सांस्कृतिक चळवळ पुन्हा एकदा सुरु झाली आहे. वातानुकूलित सुसज्ज अस सभागृह उभं राहील आहे असं मत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.  कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. 

ते म्हणाले, गणेशोत्सवा निमित्त नाथ पै. सभागृहात सकाळी दहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत विविध कार्यक्रम होणार आहेत. खास महिला मंडळांसाठी खेळ पैठणीचा व फुगडी स्पर्धा तसेच भजन स्पर्धा, ऑर्केस्ट्रा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अभिनेता दिगंबर नाईक यांच्यासह सिनेकलावंत या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. नाथ पै सभागृहाच काम सुरू होत त्यामुळे सांस्कृतिक चळवळीला ब्रेक लागला होता‌. वातानुकूलित असं सुसज्ज सभागृह उभारले असून गणपतीच्या निमित्तान होणाऱ्या या सांस्कृतिक उत्सवामुळे पुन्हा एकदा सावंतावडीत सांस्कृतिक चळवळीला सुरूवात झाली आहे असं मत मंत्री केसरकर यांनी व्यक्त केले.

रविवारी गणपती उत्सवाच्या सहाव्या दिवसापासून विसर्जन अनंत चतुर्थी पर्यंत विविध कार्यक्रम नाथ पै सभागृहात होणार आहे. महिलांची खेळ पैठणी व फुगडी स्पर्धा, ऑर्केस्ट्रा आदी कार्यक्रम होणार आहेत. बऱ्याच काळानंतर नाथ पै सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रमांचा नाद घुमू लागल्यानं सावंतवाडीत मंगलमय वातावरणात पहायला मिळत आहे. 

रविवारी या उत्सवाचा शुभारंभ मंत्री केसरकर यांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, मुख्याधिकारी सागर साळुंखे, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगांवकर, निता कविटकर, सपना नाटेकर, निलिमा चलवाडी, भारती मोरे, दिपाली सावंत, राजेंद्र शृंगारे, पुंडलिक दळवी, नंदू शिरोडकर, दत्ता सावंत, गजानन नाटेकर, परशुराम चलवाडी, भाऊ भिसे, पांडुरंग नाटेकर, शिवप्रसाद कुडपकर, श्री. टोपले, आदी उपस्थित होते. प्रास्ताविक अँड. निता कविटकर यांनी तर सुत्रसंचालन शुभम धुरी यांनी केल.

सोमवारी सुप्रसिद्ध मालवणी अभिनेते दिगंबर नाईक यांच्यासमवेत प्रसाद हेगिष्ठे निर्मित आणि स्वरांजली प्रस्तुत अजय-अतुल यांच्या गाण्याचा  सदाबहार म्युझिकल शो 'जल्लोष' होणार असून बुधवारी प्रसिद्ध मालवणी अभिनेते, सिनेस्टार दिगंबर नाईक आणि प्रसिद्ध सिनेअभिनेते सुशांत शेलार यांच्या समवेत हिंदी-मराठी गाण्याचा भव्य रंगारंग कार्यक्रम रात्रौ ठीक 9.00 वाजता बॅरिस्टर नाथ पै सभागृहात होणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन दीपकभाई केसरकर मित्रमंडळाकडून करण्यात आल आहे.