कळणे नूतन विद्यालयात शहीद पोलीस हवालदार नितीन परब यांच्या स्मृतिदिनाचं आयोजन

पोलीस निरीक्षक अरुण पवार - दै. कोकणसादचे संपादक संदिप देसाई यांची असणार उपस्थिती
Edited by: संदीप देसाई
Published on: January 04, 2024 14:50 PM
views 85  views

दोडामार्ग : शहीद पोलीस हवालदार नितीन श्रीधर परब यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवारी ८ जानेवारीला कळणेतील नूतन विद्यालयात आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विशेष भिंती फलकाचे उद्घाटन होणार आहे.

मुंबई पोलीस दलात हवालदार पदावर काम करणाऱ्या नितीन परब सिग्नलवर वाहतूक नियंत्रण करीत असताना एका माथेफिरूने गाडी मारल्याने त्यांचे निधन झाले. महाराष्ट्र  शासनाने त्यांचा कर्तव्य बजावत असताना झालेल्या दुर्दैवी मृत्यूची दखल घेऊन त्यांना शहीद म्हणून घोषित केले. कळणे गावात जन्मलेल्या या शूरवीराच्या कार्याची दखल घेऊन व त्यांच्यापासून समाजाने स्फूर्ती घेण्यासाठी प्रतिवर्षी वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन कळणे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन विद्यालय कळणे या विद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही नूतन विद्यालयात कळणे येथे  5 जानेवारीला सकाळी साडेदहा वाजता आदरांजलीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी त्यांच्या जीवनावरील विशेष लेखांच्या भिंती पत्रकांचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

संस्थाध्यक्ष मोहनराव देसाई यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास दोडामार्ग पोलीस निरीक्षक अरुण पवार, दैनिक कोकणसादचे संपादक संदीप देसाई, जिल्हा बँक संचालक गणपतराव देसाई उपस्थित राहणार आहेत. यावेळी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन मुख्याध्यापक महेंद्र देसाई यांनी केले आहे.