
देवगड : जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेचे आधारस्तंभ स्वर्गीय दामोदर तथा दामू अण्णा गोगटे यांचा पुण्यस्मरण दिन ८ एप्रिल रोजी गोगटे प्रशालेच्या प्रार्थनास्थळावर संपन्न झाला. याप्रसंगी प्रार्थनास्थळावर माजी आमदार ॲड.अजीतराव गोगटे, मुख्याध्यापक सुनील जाधव, सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
संस्थाध्यक्ष माजी आमदार ॲड.अजितराव गोगटे यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक विनायक ठाकूर यांनी स्वर्गीय दामू अण्णा गोगटे यांच्यावर अभिवादन पुष्प अर्पण केले. संस्था स्थापनेपासून शाळा निर्मिती पर्यंत दामू अण्णा गोगटे यांनी केलेले योगदान प्रेरणादायी असल्याचे मत विनायक ठाकूर यांनी व्यक्त केले. समाजकारण, अर्थकारण, आंबा सर्व्हिस, अध्यात्म व कलोपासना या क्षेत्रातील त्यांचे योगदान महत्वपूर्ण असल्याचे विनायक ठाकूर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे औचित्य साधून “ सिंधु रत्न टॅलेंट सर्च (STS) स्पर्धात्मक परीक्षेत गोल्ड मेडल प्राप्त कुमार : वेद नारायण चव्हाण इयत्ता- २ री , कुमार - हिमांशु नारायण चव्हाण इयत्ता- ४ थी , कुमार : मनोमय मृत्युंजय मुणगेकर इयत्ता - ६ वी यांना प्रत्येकी २०० रुपये तर ब्राँझ मेडल प्राप्त कुमार - आयुष प्रमोद मुणगेकर , व कुमार - अनुज मंगेश भोवर इयत्ता -६ वी याना प्रत्येकी १०० रुपयाचे पारितोषिक संस्थाध्यक्ष माजी आमदार ॲड.अजीतराव गोगटे यांच्या तर्फे व त्यांच्याच हस्ते वितरीत करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत व आभार प्रशालेचे मुख्याध्यापक.सुनील जाधव यांनी केले .